मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा भारत `अ` संघाच्या कर्णधारपदी

Last Updated: Thursday, June 12, 2014, 12:14

ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.

वेस्ट इंडिजला मिळणार दुसरा ब्रायन लारा!

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 22:14

आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी निवृत्त

Last Updated: Saturday, May 10, 2014, 12:42

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.

...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 15:45

कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला आदर आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.

ग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 18:57

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अलविदा करणार असल्याचं सांगितलं जातंय.

आशिया कपमधून धोनी बाहेर, विराटच्या खांद्यावर धुरा

Last Updated: Thursday, February 20, 2014, 21:33

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी 'साइड स्ट्रेन'च्या कारणामुळे बांग्लादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडलाय.

आफ्रिदीला व्हायचंय पुन्हा कॅप्टन

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 21:23

पीसीबीनं माझ्यापुढे कॅप्टनसीचा प्रस्ताव ठेवल्यास मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या सीरिजमध्ये टीममधल्या सीनियर खेळाडूंनी अधिक योगदान द्यावं असंही तो म्हणाला.

धोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली

Last Updated: Saturday, August 17, 2013, 15:36

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या पहिला प्रेमाची कबुली पत्नी साक्षीलाच दिली. धोनी ही कबुली ऐकून साक्षीने एक स्मित हास्य केलं. साक्षीनेही कोणताही राग व्यक्त न करता त्याच्या पहिल्या प्रेमाला दाद दिली. धोनी आपले प्रेम चाहत्यांसाठी जाहीरही करणार आहे.

क्रिकेटमुळं आलं शहाणपण – राहुल द्रविड

Last Updated: Sunday, August 11, 2013, 19:40

“माझ्या आयुष्यावर क्रिकेटचा एवढा प्रभाव पडलाय की, त्यामुळं मी एक चांगला व्यक्ती बनलो”, हे बोललाय भारताचा माजी कप्तान द वॉल राहुल द्रविड. आज एका कार्यक्रमात त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याला ही जाणीव क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या दीड वर्षानंतर झाली असल्याचंही तो म्हणाला.

महेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’

Last Updated: Saturday, August 3, 2013, 10:57

टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत राहतो. पण ही चर्चा चांगल्या कारणासाठी आहे. धोनीला प्राण्यांविषयी खूप आपुलकी आहे. ते त्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांने आधी वाघ दत्तक घेतला होता. आता तर भटके जखमी कुत्र्याचे पिल्लू (पपी) दत्तक घेतलेय.

अंतिम ओव्हरमध्ये १५ रन्सची खात्री होती - धोनी

Last Updated: Friday, July 12, 2013, 14:25

टीम संकटात आहे. अशावेळी मला खात्री होती की, मी शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रन्स करीन म्हणून, अशी प्रतिक्रिया ट्राय सिरीजच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली.

धोनीच सर्वोत्कृष्ट कर्णधार, गांगुलीनंही केलं मान्य

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 13:51

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने महेंद्रसिंग याचे कौतुक करतानाच, धोनीला भारताचा एकदिवसीय सर्वकालिक भारतीय संघाचा कर्णधार निवडलयं.

विजय झोल भारतीय संघाचा कर्णधार

Last Updated: Monday, June 17, 2013, 07:18

जालना जिल्ह्यातील विजय झोलची भारताच्या १९ वर्षांखालील वयोगटाच्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर जालना आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

पाकचा `कॅप्टन` !

Last Updated: Thursday, May 9, 2013, 23:44

एक जखम बदलणार पाकिस्तानचं नशिब ? क्रिकेटचा प्लेबॉय होणार का किंग मेकर ? किंग खान घडवणार का नवा पाकिस्तान ?

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी अभ्यासात फेल

Last Updated: Sunday, February 17, 2013, 11:16

क्रिकेट पिचवर एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करणारा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर मात्र फेल झालाय. MahendraSingh Dhoni

वर्ल्डकपसाठी भारताचं नेतृत्व मितालीकडे

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 16:07

भारतानं पुढच्या महिन्यात मुंबईत होणाऱ्या महिला विश्वकप क्रिकेटसाठी भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिची कॅप्टनपदी निवड केलीय.

रेकॉर्डब्रेक मायकल... एका वर्षात चार डबल सेन्चुरी!

Last Updated: Thursday, November 22, 2012, 17:56

ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कनं ऍडलेड टेस्टमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. क्लार्कनं एका वर्षात चार डबल सेंच्युरीज झळकावण्याचा रेकॉर्ड केलाय.

हॅप्पी बर्थडे 'कॅप्टन महेंद्रसिंग धोनी'....

Last Updated: Saturday, July 7, 2012, 00:10

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं टीम इंडियाला क्रिकेटच्या अतिउच्च शिखरावर पोहचवलं. आपल्यामधील लीडरशीप क्वालिटीमुळे त्यानं टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. भारताचा तो ऑल टाईम ग्रेट कॅप्टन आहे.

सचिन, बोल्डपेक्षा श्रीमंतीत धोनी अव्वल

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 11:09

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपणच श्रीमंत असल्याचे दाखवून दिले आहे. धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणार उसेन बोल्ड यालाही मागे टाकले आहे. ‘फोर्ब्स’ या मासिकाने जाहीर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये भल्या-भल्या खेळाडूंना धोनीने मागे टाकले आहे. टेनिस विश्वात अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच यांच्यापुढे धोनीने स्थान पटकावले आहे.

गंभीरने धोनीला दाखवून दिलं..

Last Updated: Monday, May 28, 2012, 18:16

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं आयपीएलच्या पाचव्या सीझनवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सीझनमध्ये गौतम गंभीरची कॅप्टन्सी भलतीच यशस्वी ठरली. त्याची रणनिती फाय़नलमध्येही अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांपेक्षा सरस ठरली.

सचिनने केला राम राम.... कर्णधारपदाला

Last Updated: Monday, April 2, 2012, 21:53

सचिन तेंडुलकरने आयपीएल-५ साठी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडलं आहे, आणि त्याचं कर्णधारपद हरभजन सिंहकडे सोपावलं आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी बोलून हा निर्णय घेतला.

विराट कोहलीचे भविष्य चांगले - श्रीकांत

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:55

भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

धोनीची जाणार कप्तानी, सेहवागची वर्णी!

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:25

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अक्षरश: धूळधाण उडाली, ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश मिळाल्याने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची कॅप्टनशीप धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ४-० ने हारल्याने टीम आणि कॅप्टन धोनी यांना टीकेला समोरं जावं लागत आहे.

पुन्हा कॅप्टनचं पद 'तौबा तौबा'- आफ्रिदी

Last Updated: Thursday, January 5, 2012, 18:40

गेल्या वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या आपल्या कॅप्टनपदाचा उबग येऊन पुन्हा कॅप्टन न होण्याचा निर्णय पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीने घेतला आहे.

पहिली वन-डे आज कटकच्या मैदानात...

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 03:07

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिली वन-डे मॅच कटकमध्ये आज रंगणार आहे. वीरेंद्र सेहवाग या नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया विंडिजशी मुकाबला करणार आहे.