ईशातंच बोट दाखवून अवलक्षण - Marathi News 24taas.com

ईशातंच बोट दाखवून अवलक्षण

www.24taas.com, पर्थ
 
भारताचा क्रिकेट दौरा हा भारतीयच्या खराब कामगिरीमुळे चांगलाच गाजतो आहे. मात्र आता हाच दौरा गाजतो आहे तो म्हणजे भारतीय खेळाडूच्यां वर्तणूकीमुळे. भारतीय मीडियानुसार भारताचा फास्ट बॉलर ईशातं शर्माने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट प्रेक्षकांना आपलं बोट दाखवलं आहे.. तेथील स्थानिक क्लबमध्ये गो कार्टींगसाठी आपल्या काही खेळाडूसोबत गेले असता प्रेक्षकांना आक्षेपार्ह अंगुलीनिर्देश केलं.
 
कॅप्टन धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भारतीय खेळाडू हे गो कार्टींगसाठी गेले होते. मात्र पत्रकार आणि टिव्ही कॅमेरे पाहून भारतीय खेळाडू चांगलेच नाराज झाले. टिव्ही कॅमेरा आणि पत्रकारांनी खेळाडूंना अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, यामुळे नाराज झालेल्या ईशातंने तेथील प्रेक्षकांना बोट दाखवलं
 
याआधी देखील मैदानावर विराट कोहलीने क्रिकेट प्रेक्षकांना बोट दाखवलं होतं यामुळे त्याच्या मॅच फि मधून ५०% कपात करण्यात आली होती. भारतीय टीम मॅनेजरला ईशांतच्या घटनेबाबत विचारले असता त्यांनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले आहे.
 

First Published: Monday, January 9, 2012, 23:38


comments powered by Disqus