Last Updated: Saturday, January 14, 2012, 00:14
www.24taas.com, मुंबई सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.
टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स केलेल्या लाराच्या नजरेतून पाहता चांगल्या बॅट्समन कडे १०टक्के गुणवत्ता तर ९० टक्के एकाग्रता असेल, तर तो उत्तम खेळी करु शकतो. सचिन आपल्या सेंच्युरीची सेंच्युरी कधीही करु शकेल. त्याला फक्त रेकॉर्डच बनवायचा असता तर त्याने वेस्ट इंडिज विरुध्द वन-डे खेळून भारतातच तो केला असता मात्र त्याने तसं केलं नाही.
याचाच अर्थ तो रेकॉर्डच्या मागे नसून जर त्याला महासेंच्युरी करता आली नाही तरी त्याची कामगिरी काही कमी होत नाही. अशा शब्दात लाराने सचिनला प्रोत्साहित केलंय.
First Published: Saturday, January 14, 2012, 00:14