Last Updated: Sunday, January 15, 2012, 21:51
www.24taas.com, चेन्नई 
ऑस्ट्रेलियातील दोन टी-20 आणि ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा चेन्नईत करण्यात आली. टेस्टमधील पराभवामुळे वन-डे टीममध्ये काही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित होते. मात्र, तसं काहीच घडलं नाही. निवड समितीनं सिनियर क्रिकेटपटूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
सचिन तेंडुलकर तब्बल दहा महिन्यानंतर वन-डे खेळणार आहे. तर इरफान पठाणचा तब्बल दोन वर्षानंतर टीम इंडियामध्ये कमबॅक झाला आहे. दुखापतग्रस्त प्रविण कुमार फिट झाला असून वन-डेमध्ये खेळण्यास तो सज्ज आहे. तर मुंबईकर अजिंक्य रहाणेला वगळून मनोज तिवारीला संधी देण्यात आली आहे.
वृद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेलला स्थान मिळालं आहे. हरभजन सिंगला पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे. तर युवराज सिंग अजूनही अनफिट असल्यानं त्याचा विचार करण्यात आला नाही.
First Published: Sunday, January 15, 2012, 21:51