इरफान पठाणचं 'कमबॅक' - Marathi News 24taas.com

इरफान पठाणचं 'कमबॅक'

www.24taas.com, सिडनी
 
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी बडोद्याचा फास्ट बॉलर इरफान पठाणचा टीममध्ये कमबॅक झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध इरफाननं दोन वन-डे खेळल्या होत्या. आणि आता ट्राय सीरिजमध्ये तो झहीर खानबरोबर बॉलिंग करणार आहे. २००८ सीबी सीरिजमध्ये त्यानं आपल्या बॉलिंगची छाप पाडली होती. त्यामुळे या सीरिजमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
 
टेस्टमध्ये सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडिया वन-डे आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियामध्ये इरफान पठाणचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षानंतर मिळालेल्या संधीचं सोन करण्यासाठी इरफान आतूर आहे. त्याला पाठीच्या दुखापतीनं सतावलं होतं. त्यामुळे तो गेला सीझन क्रिकेट खेळू शकला नव्हता. मात्र, त्यानं आपल्या फिटनेसवर अधिक भर दिला. आणि मैदानावर जोरदार पुनरागमन केलं. त्याची स्विंग बॉलिंग रणजीमध्ये चांगलीच प्रभावी ठरली होती. निवड समितीचं लक्ष आपल्या जबरदस्त कामगिरीनं त्यानं पुन्हा एकदा वेधून घेतलं. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
 
आपल्या स्विंगच्या जोरावर इरफाननं भल्या-भल्या बॅट्समनना नाचवलं आहे. त्याची स्विंग बॉलिंग भारतासाठी नेहमीच निर्णायक ठरली आहे. आता आपल्या स्विंगची जादू दाखवण्यास तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. टेस्टमध्ये टीम इंडियाला काही कमाल करता आली नाही. आता इरफान आपल्या बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाच्या प्रतिष्ठा कायम राखतो का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
 

First Published: Thursday, January 19, 2012, 17:55


comments powered by Disqus