Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:36
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
इंग्लंड दौऱ्यातील अपयशी कामगिरीनंतर मायदेशी परतण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या या साथीदारांनी मायभूमित चांगली कामगिरी केली आहे. आजवर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताला मुंबईत जिंकता आले नव्हते, हा इतिहास बदलणारी कामगिरी करणाऱ्या धोनी धुरंधरांनी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट आणि ५९ चेंडू राखून विजय मिळविला. यामध्ये विराट कोहलीची खेळी महत्वाची ठरली आहे.
भारताने चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर सहा विकेटसने विजय मिळवला. भारतीने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. सुरेश रैना ८० आणि विराट कोहलीने नाबाद ८६ अशी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने भारतासमोर २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने ५९ चेंडू शिल्लक ठेवत ते सहजपणे पेललं. तीन महिन्यांपूर्वी इंग्लंडने आपल्या भूमीत भारतीयांकडून हिसकावून घेतलेले साम्राज्य धोनीच्या टीम इंडियाने हैदराबाद, दिल्ली आणि मोहालीत खालसा केले.
इंग्लंड दौऱ्यातील अपयशी कामगिरीनंतर मायदेशी परतण्यासाठी धोनीच्या या साथीदारांनी ‘व्हाईटवॉश' देण्याचा विडा उचलूनच परतीचा मार्ग पकडला असेल. एक नव्हे, दोन नव्हे तर सलग चार सामन्यांत इंग्लंडला पराभवाचे खडे चारून त्यांनी मायदेशातील आपली हुकमत दाखवून दिली. ‘टीम इंडिया’च्या विजयाचे साक्षीदार होते ते वानखेडे स्टेडियम! सुरेश रैनाचा सुरेख खेळ (६२ चेंडूत ८०) आणि कोहलीचा विराटपणा (९९ चेंडूंत नाबाद ८६) मुंबईत दिवाळीच्या अगोदरच दिवाळीचे फटाके वाजविण्याची संधी देणारा ठरला.
First Published: Tuesday, October 25, 2011, 06:36