टी-२०: भारत आज तरी जिकंणार का? - Marathi News 24taas.com

टी-२०: भारत आज तरी जिकंणार का?

www.24taas.com, सिडनी
 
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज बुधवारी ऑलम्पिक स्टेडियममध्ये पहिला टी-२० सामना होणार आहे. भारत हा पहिलावहिला टी-२० सामना जिंकून आपला हरवलेला आत्मविश्वास मिळविण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टेस्टमध्ये केलेली कामगिरी पुढे देखील चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार हा सामना आज दुपारी २.०५ वा. सुरू होईल.
 
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजवर चार आतंरराष्ट्रीय टी-२० मॅच झालेल्या आहेत. ज्यात दोनदा भारताने बाजी मारली आहे तर दोनदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण आत्ताच झालेल्या टेस्ट मॅच सीरीजमध्ये टीम इंडियाला ४-० ने मात मिळाली असल्याने याचा फायदा घेण्याचा ऑस्ट्रेलिया नक्कीच प्रयत्न करेल. पण दोन्ही टीममध्ये बरेच बदल असणार आहेत. टीम इंडियामध्ये रवींद्र जडेजा, इरफान पठाण, पार्थिव पटेल, सुरेश रैना, मनोज तिवारी, प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांचा समावेश असणार आहे.
 
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीमदेखील वेगळी असणार आहे. ऑस्टेलिया टीमचा कॅप्टन जॉर्ज बैले हा असणार आहे, पण जॉर्ज यांने आजपर्यंत एकही आतंरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळलेला नाहीये. तर त्यांची आतंरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरवात देखील आजच्या सामन्यापासून होणार आहे. तर अनुभवी स्पिनर ब्रॅड हॉग हा प्रदीर्घ काळानंतर टीममध्ये परतला आहे. शॉन मार्श आणि डेविड वॉर्नर हेच फक्त टेस्ट टीममध्ये भारताविरूद्ध खेळले होते. ऑस्ट्रेलिया टीम मध्ये एरॉन फिंच, डेविड हसी, ट्रेविस बर्ट, मिशेल मार्श, डेनियल क्रिस्टियन, मैथ्यू वेड आणि अनुभवी ब्रेट ली ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 

First Published: Wednesday, February 1, 2012, 11:08


comments powered by Disqus