श्रीलंकेची पहिली विकेट - Marathi News 24taas.com

श्रीलंकेची पहिली विकेट

www.24taas.com, ऍडलेड
 
श्रीलंकेची पहिली विकेट गेली आहे. उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली.
 
लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
 
सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लंकेला पराभूत करून टेबल टॉपर बनण्याची टीम इंडियासमोर नामी संधी आहे. रोमहर्षक लढतीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली.
 
श्रीलंकेला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या विजायाची नोंद करण्यासाठी जयवर्धनेची टीम प्रयत्नशील असेल. लसिथ मलिंगावर त्यांची बॉलिंगची भिस्त असेल. तर बॅटिंगमध्ये तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराला स्फोटक बॅटिंग करावीच लागणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी कॅप्टन महेला जयवर्धने आणि ऍन्जेलो मॅथ्यूजवर असेल.  आता, भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखते की, लंका आपला पहिला विजय मिळविण्यात यशस्वी ठरते याकडेच क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.
 
 

First Published: Tuesday, February 14, 2012, 12:35


comments powered by Disqus