Last Updated: Monday, February 27, 2012, 16:17
www.24taas.com, होबार्ट टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकेची झोड उठविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट लीने याबाबत खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मी सचिन तेंडुलकर रन आऊट झाला. त्यावेळी त्याला जाणूनबुजून अडविले नसल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाने काल भारतावर ८७ धावांनी मात केली, मात्र, काल चर्चेचा विषय सचिन तेंडुलकर रन आऊट चुकीच्या पध्दतीने झाला हेच होते.
या संदर्भात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर ट्विट करताना ब्रेट ली म्हटला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाने खेळाडू खूप उत्साहित आहेत, परंतु, मी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा रस्ता जाणूनबुजून अडविला नव्हता.
भारतीय फलंदाजीच्यावेळी सचिन तेंडुलकर चांगली फलंदाजी करत असताना सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चोरटी धाव काढताना ब्रेट ली मध्ये आला आणि सचिन तेंडुलकर धावबाद झाला.
First Published: Monday, February 27, 2012, 16:17