ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा

Last Updated: Saturday, July 14, 2012, 08:47

ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार बॉलर ‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय.

सचिनच्या मार्गात मुद्दाम नाही आलो- ब्रेट ली

Last Updated: Monday, February 27, 2012, 16:17

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकेची झोड उठविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट लीने याबाबत खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मी सचिन तेंडुलकर रन आऊट झाला. त्यावेळी त्याला जाणूनबुजून अडविले नसल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे.