Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:45
www.24taas.com, बोस्टन 
भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर अमेरिकेतील बोस्टन येथे ट्युमरवर चांगलले उपचारांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. युवराजने टि्वीटरवर ट्वीट केलं आहे की, मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, मी स्वत:ला खूप कमजोर समजतो आहे. ट्वीटमध्ये त्याने असंही म्हटलं आहे की, केमोथेरेपीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे, पुढील उपचार ७ मार्चपासून सुरू होणार आहे.
युवराजने केमोथेरेपीचा पहिला टप्पा पूर्ण केलं तेव्हा देखील ट्वीट केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की, त्याला असणारा ट्युमर जवळजवळ नाहीसा होत आला आहे. तसचं येथील डॉ. लारेन्स कडून मला ही चांगली बातमी मिळाली आहे. माझं आज झालेलं स्कॅनिंग यामुळे असं समजतं की, ट्युमर हा नाहीसा झालेला आहे. आता उपचारांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे त्याच्या पाठीराख्यांना हायसे वाटले होते. पण आता युवीने केलेल्या ट्वीटने त्याच्या फॅन्सला धक्का पोहचला आहे.
वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावणारा युवराज गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही टूर्नामेंट खेळू शकलेला नाही. युवराज पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी केव्हा येईल यांचीच त्याचे चाहते वाट पाहत आहेत. युवराजने ३७ टेस्टमध्ये ३४.८० च्या स्ट्राईक रेटने १७७५ रन काढले आहेत. तर २७४ वनडे मध्ये ३७.६२ च्या स्ट्राईक रेटने ८०५१ रन काढले आहेत. तर २३ टी-२० मॅचमध्ये त्याच्या नावावर ५६७ रन केले आहेत.
First Published: Thursday, March 1, 2012, 13:45