वर्ल्डकप इंडिया-पाक सेमीफायनल फिक्स होती! - Marathi News 24taas.com

वर्ल्डकप इंडिया-पाक सेमीफायनल फिक्स होती!

www.24taas.com, नवी दिल्ली
 
30 मार्च 2011 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलची मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केलं आहे. यामध्ये एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीचं नाव असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.  आयसीसी आता भारत आणि पाकिस्तान मॅचची चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे या वृत्तपत्रानं दिलेल्या पुराव्याचीही आयसीसी चौकशी करणार आहे.
 
या मॅचबरोबरच इंग्लिश काऊंटीमध्येही फिक्सिंग होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण ताजं असतांनाच आता वर्ल्ड कपची मॅच फिक्स असल्याची चर्चा सुरु झाल्यानं पुन्हा एकदा क्रिकेटवर फिक्सिंगचं सावट निर्माण झालं आहे.
 
या मॅचमध्ये खेळांडूना हजारो पौंड देण्यात आल्याचा दावाही संडे टाईम्सने केला आहे. यात 44,000 पौंड बॅट्समनने कमी रन बनविण्यासाठी, तर 50,000 पौंड बॉलरने जास्तीत जास्त रन करण्यासाठी दिले गेले होते तसचं यात काही अधिकारीही गुंतले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे समजते.
 
तसचं काऊंटी क्रिकेटमध्येही फार मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचे अनेक सट्टेबाजांनी सांगितले आहे. तसचं छोट्या स्तरावरील मॅचकडे फारसं कोणाचं लक्ष नसल्याने अशी फिक्सिंग करणं देखील धोकादायक नसतं
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 15:44


comments powered by Disqus