मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत- नुपूर - Marathi News 24taas.com

मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत- नुपूर

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूड अभिनेत्री नुपूर मेहताने आज तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटं असल्याचे सांगितले आहे. तिच्यावर असा आरोप होता की, भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळविण्यात आलेल्या सेमीफायनल मॅचमध्ये फिक्सिंग करण्यात नुपूर मेहताचा हात आहे.
 
वर्ल्डकपमधील इंडिया पाकिस्तान सेमीफायनल मॅच फिक्स होती असे काल संडे टाईम्सने प्रसिद्ध केले आणि क्रिकेट विश्वातही एकच खळबळ माजली, मात्र त्याच सोबत बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या कारण की संडे टाईम्सनुसार बॉलिवूडची एक अभिनेत्रीही फिक्सिंग प्रकरणात अडकली होती. अभिनेत्री नुपूर मेहता ही या फिक्सिंगमध्ये अडकली असल्याचे संडे टाईम्सने स्पष्ट केले होते.
 
तसंच लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्राला देखील तिने धमकी दिली आहे की, त्याच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. 'द संडे टाईम्सने' दिल्लीत एक स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्यात त्याचं असं म्हण आहे की, २०११च्या सेमीफायनल मॅचच्या फिक्सिंगमध्ये नुपूर मेहताचा हात आहे.
 
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 22:51


comments powered by Disqus