Last Updated: Tuesday, March 20, 2012, 22:44
www.24taas.com, मीरपूरबांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला घरी परतण्याची नामुष्की ओढावली आहे. बांग्लादेशने लंकवेर पाच विकेटने मात केली.एशिया कपमध्ये बांग्लादेशने इतिहास घडवला आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे बांग्लादेशसमोर ४० ओव्हर्समध्ये २१२ रन्सचं आव्हान होतं. बांग्लादेशने ३७.१ ओव्हर्समध्ये पाच विकेट राखत सहज विजय मिळवला.
तीन सामन्यानंतर बांग्लादेश आणि भारताच्या नावावर प्रत्येकी आठ गुण जमा होते. पण बांग्लादेशने साखळी सामन्यात भारतालासुद्धा पराभूत केलं होतं त्यामुळे त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे.
First Published: Tuesday, March 20, 2012, 22:44