दिलशानशी माझे अफेर - नुपूर मेहता - Marathi News 24taas.com

दिलशानशी माझे अफेर - नुपूर मेहता

www.24taas.com, लंडन
 
क्रिकेट मॅच फिक्सिंगचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. कारण बॉलिबूडमधील मॉडेल नुपूर मेहताने आपले गॉसीप उघड केले आहे. नुपूरने म्हटले आहे की, श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याच्याशी आपले प्रेमसंबंध आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही डोके खूपसू नये, असे ती सांगायला विसरली नाही.
 
 
दिलशान आणि नुपूर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा डेली मेल या वृत्तपत्राने केला आहे. दिलशान आणि नुपूर यांची ओळख २००९मध्ये इंग्लंडमध्ये झाली. यावेळी ट्वेंटी-20 वर्ल्डकप सुरू होता. काही दिवसांपूर्वी लंडनमधील द संडे टाइम्सने नुपूचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते.  नुपूर हिच्यासारखी मॉडेल क्रिकेट खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसविण्यासाठी सट्टेबाजांना मदत करायची.
 
 
सट्टेबाजांना मदत करण्याचा आरोप नुपूरने फेटाळला होता. मात्र, तिच्या या व्यक्तव्यावरून तीचे क्रिकेट जगताशी संबंध होते हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नुपूरचे म्हणणे आहे की, मी सुंदर आहे. मला स्वातंत्र्य आहे. मी लोकांशी संपर्क साधीन त्यातून ओळखही वाढवेन. माझ्या वैयक्तिक जीवनात कोणीही नाक खूपसू नये.
 
 

First Published: Thursday, March 22, 2012, 12:34


comments powered by Disqus