Last Updated: Friday, March 23, 2012, 17:03
www.24taas.com, नवी दिल्ली मास्टर ब्लास्ट आणि महाशतकवीर सचिन तेंडुलकर याच्या ८० शतकांची मी साक्षीदार आहे, असे उद् गार माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांने काढले आहेत. यावेळी कुंवळेने विराट कोहलीचे कौतुक केले.
सचिनच्या महाशतकाचेही कुंबळेने कौतुक केले आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. त्याच्या १०० शतकांपैकी ८० शतकांचा मी साक्षीदार आहे. सचिन हा सचिन आहे, असे सांगून भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज युवा फलंदाज विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी करत आहे, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी एकदम फिट आहे, असे म्हटले. मात्र, असे असले तरी राहुल द्रविडची जागा कोणीच घेऊ शकत नाही. १६ वर्षे खेळात सातत्य टिकवीत २३ हजार धावा केल्या आहेत, ही सोपी गोष्ट नाही, कुंबळे म्हणाला.
विराटला १९ वर्षाखालील संघात खेळत होता, तेव्हापासून पाहत आलो आहे. तो खरोखरच अनुभवी आहे. गेल्या एक वर्षापासून त्याच्यात खूपच बदल झाला आहे. त्याने सर्वच बाबतीत बदल घडवून आणला आहे. त्यामुळे त्याचे भविष्य चांगले आहे, असा उल्लेख कुंबळे केला.
First Published: Friday, March 23, 2012, 17:03