Last Updated: Tuesday, March 27, 2012, 15:58
www.24taas.com, वडोदरा पठाण बंधूंच्या वडोदऱ्यातील घरात सध्या उत्सवी वातावरण आहे. मोठा मुलगा युसुफ विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या या धमाकेदार खेळाडूचा नुकताच मुंबईमध्ये ‘आफ्रीन’ हिच्यासोबत साखरपुडा झाला.
साखरपुडा नेमका कधी झाला, याबद्दल जरी गुप्तता बाळगली असली, तरी साखरपुडा झालाय एवढं मात्र नक्की सांगण्यात आलंय आणि या वर्षीच युसुफचा विवाह होणार आहे. पण, याच वेळी धाकटा भाऊ इर्फान याच्या लग्नाबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. इर्फान गेला बराच काळ शिवांगी देव हिच्याबरोबर डेटिंग करत आहे. शिवांगी भारतीय राजदुतांची कन्या आहे. मात्र, मोठ्या भावाचं लग्न होईपर्यंत थांबायचं ठरवल्यामुळे आत्तापर्यंत इर्फानने लग्न केलं नव्हतं. तेव्हा आता युसुफ बरोबरच इर्फानचंही लग्न युसुफच्या बरोबरच त्याच दिवशी होण्याची शक्यता आहे.
एकाच दिवशी लग्न करण्याची कल्पना युसुफ आणि इर्फान दोघांनाही मान्य आहे. तेव्हा, लवकरच दोन्ही पठाण बंधू एकाच दिवशी एकाच मांडवाखाली विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे. पठाण कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन!
First Published: Tuesday, March 27, 2012, 15:58