Last Updated: Saturday, November 19, 2011, 11:45
झी २४ तास वेब टीम, मुंबई
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही धोनी अँड कंपनीनं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, क्रिकेटप्रेमी मॅचेसना गर्दी करतांना दिसत नाहीत. सचिनची शंभरावी सेंच्युरीही कुठल्याही क्षणी होऊ शकते मात्र तरीही चाहते पाठ फिरवतांना दिसत नाही. क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी करावी यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं तिसऱ्या टेस्टसाठी तिकीटांचे दर अतिशय कमी केले आहेत.

वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडचे पाच दिवसांचे तिकीट ५०० रुपये आहे. तर सुनिल गावसकर स्टँडचे लोअर स्टँडचे तिकीट १५० रुपये आहे. त्याचप्रमाणे अप्पर स्टँडचे तिकीट ५०० रुपये आहे. विठ्ठल दिवेच्या पॅव्हेलियनचे तिकीट ६०० रुपये आहे. तर एका दिवसाची तिकीटे अनुक्रमे १०० रुपये, ५० रुपये, १०० रुपये आणि १५० रुपये आहे. विजय मर्चंट पॅव्हेलियनचे तिकीट १०० रुपये आहे.
मुंबईत तिस-या टेस्टसाठी तिकीटांचे दर कमी केले आहेत. त्यामुळे टेस्ट सुरु झाल्यावर क्रिकेटप्रेमी या मॅचला मोठा प्रतिसाद देतात का? ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे. भारतामध्ये अथवा भारताबाहेर टीम इंडिया मॅच खेळत असली तरी मॅच पाहण्यासाठी नेहमीच क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर गर्दी करतांना दिसायचे. टीम इंडियाच्या विरुद्ध कुठली टीम असली तरी चाहत्यांचा सपोर्ट हा भारतीय टीमलाच मिळायचा. भारतात तर क्रिकेट हा धर्म आहे आणि क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा मिळालेला आहे. मात्र, सध्या चित्र बरोबर उलट दिसून येतं. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये चाहत्यांनी पाठ फिरवली होती. आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. दिल्ली आणि कोलकाता टेस्टमध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या रोडावलेली दिसली. चाहत्यांच्या अल्प प्रतिसादामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशननं तिसऱ्या टेस्टसाठी तिकीटांचे दर कमी केले आहेत.
First Published: Saturday, November 19, 2011, 11:45