युवी खराखुरा 'फायटर' - इरफान - Marathi News 24taas.com

युवी खराखुरा 'फायटर' - इरफान

www.24taas.com, नवी दिल्ली
 
युवराज सिंग हा फक्त मैदानातलाच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातलाही योद्धा आहे असं मत टीम इंडियाच्या इर्फान पठाणने व्यक्त केलं आहे. २७ वर्षीय इर्फान पठाण सध्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे खेळत आहे. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना इर्फान म्हणाला, “युवी हा फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही तितकाचा मोठा योद्धा आहे.”
 
अमेरिकेत कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतर आणि लंडनमध्ये आराम केल्यानंतर भारताचा स्टार बॅट्समन युवराज सिंग आज भारतात  परतला. युवराजचे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आलं.
 
पाठीला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे संघातून दूर असलेला इर्फान आपल्या पुनरागनाबद्दल खुश आहे. आपलं संपूर्ण लक्ष टीमच्या कामगिरी उंचावण्यावर असून माझं योगदान त्यात तितकंच महत्तवाचं असेल, असा दावा इर्फानने केला आहे. आयपीएल मध्ये विरेंद्र सेहवागच्या संघात खेळत असलेल्या इर्फानने सेहवाग हा अतिशय उत्तम कॅप्टन असल्याचं म्हटलं आहे. मी सेहवागच्या कर्णधारपदाला १० पैकी १० गुण देईन, असंही तो म्हणाला.

First Published: Thursday, April 12, 2012, 17:19


comments powered by Disqus