सचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली... - Marathi News 24taas.com

सचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली...

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी नाकारली आहे. सचिन तेंडुलकरसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता.
 
१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार आरपीआय करणार होता. सचिनच्या महासेंच्युरीच्या निमित्ताने आरपीआयतर्फे सचिनचा सत्कार होता. मात्र आता हा सोहळ्यालाच परवानगी नाकारल्याने सचिनच्या सत्कार देखील होणार नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टनं ही परवानगी नाकारल्यानं आरपीआयने नाराजी व्यक्त केली आहे.
 
मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली असल्याने आता आरपीआय नक्की काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. परवानगी नाकारली गेल्याने आरपीआयचे कार्यकर्ते मात्र  नाराज झाले आहेत. सचिन तेंडुलकरसह विविध मान्यवरांचा सत्कार होणार होता. मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे.
 
 
 

First Published: Thursday, April 12, 2012, 17:51


comments powered by Disqus