Last Updated: Friday, April 13, 2012, 09:04
www.24taas.com, मोहाली टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा अँडम गिलख्रिस्टचा निर्णय योग्य ठरला. किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या पाचव्या मोसमात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. किंग्स इलेव्हननं कोलकात्याचा दादा आणि पुणे वॉरियर्सचा नेता सौरभ गांगुलीला प्रीतीच्या संघाने धक्का देत सात विकेट्सनी मात केली.
सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्सचा अश्वमेध रोखण्यात किंग्स इलेव्हन पंजाबला यश मिळाले. मोहालीत झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हननं पुणे वॉरियर्सचा सात विकेट्स आणि चौदा चेंडू राखून धुव्वा उडवला. गांगुलीच्या पुणे वॉरियर्सचा हा तीन सामन्यांमधला पहिलाच पराभव होता, तर किंग्स इलेव्हनचा हा तीन सामन्यांमधला पहिला विजय ठरला. मॅस्करन्हस आणि शॉन मार्श हे पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पुणे वॉरियर्सचा डाव १९ षटकांत अवघ्या ११५ रन्समध्ये गुंडाळला गेला. पंजाबने विजयासाठीचं लक्ष्य १७.४ षटकातच पार करीत सामना खिशात टाकला., शॉन मार्शनं ५४ चेंडूंत नाबाद ६४ धावांची खेळी करून पंजाबच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यानं सात चौकार आणि एक षटकार ठोकला.
First Published: Friday, April 13, 2012, 09:04