महाशतकाची पुन्हा हुलकावणी - Marathi News 24taas.com

महाशतकाची पुन्हा हुलकावणी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. गेल्या सात महिन्यांपासून त्याच्या सेंच्युरींच्या सेंच्युरीची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमीना होती. सचिन तेंडुलकरच्या विक्रमी शंभराव्या सेंच्युरीची प्रतीक्षा अवघ्या क्रिकेटविश्वाला गेल्या कित्येक दिवसांपासून आहे.
 
तब्बल सात महिन्यांपासून सचिनच्या महासेंच्युरीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलं होतं.  गेल्या १६ इनिंग्समध्ये त्याला आपली महासेंच्युरी पूर्ण करता आली नाही. मात्र भारतीय क्रिकेटच्या पंढरीत महासेंच्युरी झळकावण्याची संधी सचिनला होती. विंडीजविरुद्ध टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर सचिन तेंडुलकर ६७ रन्सवर नॉट आऊट होता. त्यामुळे चौथ्या दिवशी सर्वांचं लक्ष होतं ते केवळ सचिनकडेच. पण महासेंच्युरीने पुन्हा एकदा सचिनला हुलकावणी दिली.
 
ज्या मैदानावर सचिनचं वर्ल्ड कप जिंकण्याचं २१ वर्षापूर्वीच स्वप्न पूर्ण झालं. त्याच मैदानावर महासेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम सचिन करतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सचिनचं महशतक पुन्हा एकदा हुकलं.

First Published: Friday, November 25, 2011, 05:27


comments powered by Disqus