Last Updated: Friday, November 25, 2011, 13:39
झी २४ तास वेब टीम, मुंबईवेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या तीन वनडे सामान्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची धुरा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, कसोटीमध्ये डच्चू देण्यात आलेल्या टर्बनेटर हरभजन सिंगला वन डेमधूनही वगळण्यात आले आहे. अश्विन आणि ओझा यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे हरभजनचे तिकीट पुन्हा कापण्यात आले.
भारतीय संघ पुढील प्रमाणेवीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, मनोज तिवारी, प्रविण कुमार, विनय कुमार, उमेश यादव, विराट कोहली, पार्थिव पटेल, वरूण ऐरॉन, राहुल शर्मा, अजिंक्य राहणे, रविचंद्र अश्विन.
First Published: Friday, November 25, 2011, 13:39