Last Updated: Sunday, April 29, 2012, 17:42
www.24taas.com, मुंबई सचिन तेंडुलकरचं नाव खासदारकीसाठी नियुक्त केल्यावर त्यावर बऱ्याच टीका झाली. यासंदर्भात बोलताना प्रख्यात गायिका लता मंगेशकर म्हणाल्या, जर सचिन आपल्या बिझी शेड्युमधून वेळ काढू शकला तर तो नक्की चांगला खासदार बनू शकतो.
८२ वर्षीय लता मंगेशकर म्हणाल्या, “मी स्वतः खासदार असताना राज्यसभेत फारशी जाऊ शकले नाही. कारण, माझं तेव्हा रोज रेकॉर्डिंग असायचं. तसंच मी माझ्याकार्यकाळात संसदेत एकही शब्द बोलले नाही. याबद्दल माझ्यावर खूप टीकाही झाली. तरीही मी म्हणेन की माझा एकूण अनुभव ठीक होता.”
सचिनबद्दल लतादीदी म्हणाल्या, “सचिन हुषार, सज्जन आणि समजुतदार आहे. त्यांना जे बोलायचं असेल, ते नक्की बोलतील. ज्याप्रमाणे सचिनने क्रिकेटमध्ये नाव कमावलं, त्याप्रमाणेच ते राज्यसभेतही नाव कमावतील.”
सचिनवर होत असलेल्या टीकेबद्दल लतादीदी म्हणाल्या, “प्रत्येक महान माणसावर टीका होतच असते. सचिनने या टीकेकडे लक्ष देऊ नये. त्यांनी आपलं काम करत राहावं. सचिनकडून अनंत अपेक्षा आहेत.”
First Published: Sunday, April 29, 2012, 17:42