मुंबईचा पुण्यावर एका धावेने विजय - Marathi News 24taas.com

मुंबईचा पुण्यावर एका धावेने विजय

www.24taas.com, पुणे
 
 
मुंबईने पुण्यावर विजय मिळवला. तोही केवळ १ धावेने. मुंबईच्या 120 धावांचा पाठलाग करणं पुण्याच्या संघाला जमलं नाही. अगदी अखेरच्या बॉलपर्यंत पुण जिंकणार की मुंबई हे निश्चित सांगता येत नव्हतं. पुण्यासमोर १२० धावांचंच लक्ष्य असल्यामुळे पुणे जिंकेल शी आशा होती. मात्र, मुंबईनेच शेवटच्या बॉलवर बाजी मारली.
 
 
पुण्यातील सहारा स्टेडियमवर होत असलेल्या लढतीत पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे व स्टीव स्मिथने तीन फलंदाजांना धावबाद केल्याने मुंबई इंडियन्सला निर्धारित २० षटकात ९ बाद १२० धावाच करता आल्या. त्यामुळे पुणे वॉरियर्सला आजचा सामना जिंकण्यासाठी १२१ धावांची गरज होती. नेहरा, भुवनेश्वर यांनी प्रत्येकी घेतलेल्या दोन-दोन बळीमुळे व स्टीव स्मिथने तीन फलंदाजांना धावबाद केल्याने मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पडले.
 
 
सचिनने केलेल्या ३४  आणि फ्रॅकलिनने केलेल्या २५वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नव्हती. अखेरच्या दोन षटकात यष्टीरक्षक दिनेश कार्तिक नाबाद १८ आणि मलिंगाने १४ रन्ससाठी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला लाज राखता आली. अन्यथा त्यांना शंभरीही गाठता आली नसती. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हरभजनसिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

First Published: Friday, May 4, 2012, 07:57


comments powered by Disqus