शेवटच्या बॉलवर फोर... आणि मुंबईचा विजय! - Marathi News 24taas.com

शेवटच्या बॉलवर फोर... आणि मुंबईचा विजय!

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राऊंडवर चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली आहे. चेन्नई आणि मुंबईमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईवर थरारक विजय मिळवला आहे.  चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सला १७४ रनचे आव्हान लिलया पेललं. मुंबई इंडियन्सने शेवटच्या बॉलपर्यंत सामना नेला होता. त्यामुळे सामन्यात चांगलीच रंगत आली होती. आणि शेवटच्या बॉलवर फोर मारून मुंबई इंडियन्सने आपला विजय साकारला.
 
मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १७४ रन केले. शेवटच्या तीन बॉलवर १४ रनची गरज असताना ड्वेन स्मिथने एक सिक्स आणि दोन फोर मारत विजय अक्षरश खेचून आणला. सलामीवीर जेम्स फ्रॅकलिन केवळ १ रनवर आऊट झाला होता. त्यामुळे सुरवातीलाच मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या होत्या.
 
पण सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा आपल्या टीमच्या मदतीला धावून आला. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने अर्धशतक झळकावत मोक्याची क्षणी धावा काढल्या. फ्रॅकलिन आऊट झाल्यानंतर सचिनने रोहित शर्माला सोबत घेऊन टीमचा डाव सावरला आणि वेगाने धावा घेतल्या. रोहितबरोबर त्याने शतकी भागीदारी करीत १२६ रनची भर घातली. सचिनने ४४ बॉलमध्ये  ११ फोर आणि १ सिक्स ७४ रन केल्या.
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 20:15


comments powered by Disqus