पंजाबचा डेक्कन चार्जर्सवर २५ धावांनी विजय - Marathi News 24taas.com

पंजाबचा डेक्कन चार्जर्सवर २५ धावांनी विजय

www.24taas.com, हैदराबाद
 
आयपीएल-5 मधील 53 व्या लढतीत किंग्ज इलेवन पंजाबच्या गोलंदाजीपुढे डेक्कनचे फलंदाज ढेपाळले. पंजाब संघाने डेक्कन चार्जर्सवर 25 धावांनी सहज विजय मिळविला. पंजाबकडून विजयासाठी मिळालेल्या 171 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला डेक्कन चार्जर्सला आठ बाद 145 धावाच करता आल्या. सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाने पाच गडी गमावून 170 धावा केल्या होत्या.
 
पंजाबने डेक्कनला दिलेल्या 170 धावांच्या आव्हानापुढे डेक्कनची खराब सुरुवात झाली.  सलामीवीर मनदीप सिंग याने काढलेल्या आक्रमक 75 धावामुळे पंजाबने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. डेविड मिलरने नाबाद 28 धावा काढत चांगली साथ दिली. या सामन्यात डेक्कनने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीला पाचारण केले होते. त्याचा पंजाबने चांगला फायदा घेतला. डेक्कनच्या आशिष रेड्डीने 2 गडी बाद केले.

First Published: Wednesday, May 9, 2012, 17:17


comments powered by Disqus