Last Updated: Wednesday, May 9, 2012, 17:17
आयपीएल-5 मधील 53 व्या लढतीत किंग्ज इलेवन पंजाबच्या गोलंदाजीपुढे डेक्कनचे फलंदाज ढेपाळले. पंजाब संघाने डेक्कन चार्जर्सवर 25 धावांनी सहज विजय मिळविला. पंजाबकडून विजयासाठी मिळालेल्या 171 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला डेक्कन चार्जर्सला आठ बाद 145 धावाच करता आल्या.