विराट कोहलीचे ब्राझीलच्या मॉडेलशी ‘गॅटमॅट’, Virat Kohli is dating a Brazilian model

विराट कोहलीचे ब्राझीलच्या मॉडेलशी ‘गॅटमॅट’

विराट कोहलीचे ब्राझीलच्या मॉडेलशी ‘गॅटमॅट’
www24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या ब्राझीलची मॉडेल इजाबेल लीटे हिच्यासोबत डेटिंग करण्यात व्यस्त आहे.

यावर्षी दोघांना सिंगापूर येथे शॉपिंग करताना पाहिले होते, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. गेल्या ७ जून रोजी सिंगापूरच्या ओरचर्ड रोडवर विराट आणि इजाबेल शॉपिंग करत होते, तेव्हा कोणीतरी त्यांचा फोटो काढला. विराट त्यावेळी इजाबेलची बॅग घेऊन चालत होता.

या वृत्तानुसार इजाबेल आता मुंबईत शिफ्ट झाली आहे. तसेच तिच्या मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू असतात. यावेळी ती विराटसोबत वेळ घालवत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

या संदर्भात विराट कोहलीला विचारल्यावर त्याची भंबेरी उडाली, मला पत्रकार परिषदेत वैयक्तीक प्रश्न विचारू नये, असे म्हणून तो पत्रकार परिषदेतून उठून गेला.

First Published: Monday, November 12, 2012, 15:30


comments powered by Disqus