वन-डे रँकिंगमध्ये कोहलीच ठरला `विराट`!Virat Kohli reclaims number one ICC ODI batting ranking

वन-डे रँकिंगमध्ये कोहलीच ठरला `विराट`!

वन-डे रँकिंगमध्ये कोहलीच ठरला `विराट`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. बॅट्समनच्या रँकिंगमध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकत नंबर वनचं स्थान पटकावलं आहे.

कोहलीनं ८८१ पॉईंट्सची कमाई करत बॅट्समनच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज केलं आहे. आशिया कपमध्ये कोहलीनं बांग्लादेशविरुद्ध कोहलीनं १३६ रन्सची शानदार इनिंग खेळली होती आणि याचाच फायदा त्याला आपलं रँकिंग वाढवण्यात झाला.

आशिया कपमध्ये विराटनं ३ मॅचेस खेळल्या आणि यामध्ये १३६ रन्स केले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 21:10


comments powered by Disqus