Last Updated: Monday, June 16, 2014, 12:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशोधा म्हणजे सापडेल अशी वेळ चक्क विराटनी आणली होती. रविवारपासून बांगलादेशात वन डे सिरीज सुरु झालीय, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत टीममध्ये विराट नव्हता. तर विराट होता कोठे ?
चक्क विराट त्याची गर्लफ्रेंड अनुष्कासोबत स्पेनमध्ये दिसला. स्पेनमधील बार्सिलोनात एका हॉटेलमध्ये झोया अख्तरचा आगामी चित्रपट `दिल धडकन दो`चे चित्रीकरण सुरु असताना विराट तेथे जाऊन पोहोचला.
बॉलिवूड सूत्रांच्या सांगण्यानूसार, विराट तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आला होता. आपल्याला कोणी बघू नये म्हणून दोघांनी ही काळजी घेतली होती, मात्र ही लव्ह बर्डस बॉलिवूडकरांच्या नजरेत आलीच.
मग बातमी पसरली संपूर्ण, बॉलिवूडकरांपर्यंत मात्र एक गोष्ट नक्कीच लक्षात आली, ती म्हणजे विराट आपल्या प्रेमात किती प्रामाणिक आहे ते समजलं. तर आता क्रिकेट बद्दल काय बोलायचं ?
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 11:06