Last Updated: Tuesday, February 18, 2014, 13:37
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टनबॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लिप सर्जरीवरून विराट कोहली चांगलाच नाराज झाला आहे. या प्रश्नावरून विराट कोहली चांगलाच संतापला.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा न्यूझीलंड दौऱ्या दरम्यान एकाने फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकला, यावरही विराटने नाराजी व्यक्त केली आहे.
हा अनुष्का शर्माचा खासगी प्रश्न आहे, तसेच माझ्या खासगी आयुष्यात लक्ष देण्याचं काही कारण नाही.
काही दिवसांपूर्वी कॉफी विद करन या कार्यक्रमात अनुष्का शर्मा बदलल्यासारखी वाटत होती, आणि तेव्हाच अनुष्काच्या लिप सर्जरीच्या बातम्या येऊ लागल्या.
अनुष्का शर्माने आपण कोणतीही सर्जरी केली नसल्याचं ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
अनुष्का आणि विराटचा न्यूझीलंड दौऱ्यावरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावरून अनुष्का आणि विराटच्या रिलेशनवरून खमंग चर्चा सुरू झाली आहे.
अनुष्का आणि विराटची ओळख एका जाहिरातीचं चित्रिकरणात झाली होती. मात्र अनुष्काने ही सर्जरीची बातमी एक अफवा असल्याचं म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 13:29