टीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!Will Zaheer Khan change the fortunes of India in Tests?

टीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!

टीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमधील भारतीय बॅट्समन्सच्या कामगिरीनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला... कारण धोनी ब्रिगेडची टेस्टमध्येही फास्ट बॉलिंगपुढं अशीच भंबेरी उडाली तर पुन्हा व्हाईटवॉश अटळ आहे... टीम इंडियाचा एकही बॅट्समन द. आफ्रिकन पेस ऍटॅकचा सामना करताना दिसला नाही... मात्र टेस्ट सीरिजपूर्वी अचानक धोनीची ही चिंता कमी झालेली दिसली...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालेल्या सचिननं याआधी अनेकदा प्रतिस्पर्धी टीम्सची तारांबळ उडवून दिली होती... प्रतिस्पर्धी बॉलिंगची पिसं काढली होती... तो सचिन आता पुन्हा मैदानात उतरणार का? हाच प्रश्न सर्वांना सतावत असणार... पण जर सचिन रिटायर झाला आहे तर तो द.आफ्रिकेला आव्हान कसा देणार?... तर याचं उत्तर आमच्याकडे आहे... आम्ही आता आपली भेट घडवणार आहोत कॅप्टन धोनीच्या सचिनशी जो अनेकदा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला आहे...

कॅप्टन धोनी हा झहीर खानला बॉलिंगमधील टीम इंडियाचा सचिन मानतो... टीमकरता ज्या रोलमध्ये सचिन एक बॅट्समन म्हणून खेळायचा... त्याच तडफेनं आणि जिद्दीनं झहीर बॉलिंगमधील आपली जबाबदारी पार पाडत असतो...

या ३५ वर्षीय फास्ट बॉलरकडे अनुभवाची अजिबात कमतरता नाही आहे... त्यामुळं जेव्हा वन-डे सीरिजमध्ये टीम इंडिया फ्लॉप होत होती.. तेव्हा प्रत्येकाला झहीरची आठवण येत होती... टीम इंडियाची सद्यस्थिती पाहून झहीरनंसुद्धा आपला होमवर्क पूर्ण केला आहे...

झहीरच्या टीममध्ये असण्यानं भारतीय गोटात सध्या उत्साह संचारला आहे... द. आफ्रिकेत बॉलिंग करण्याचा झहीरला असलेला अनुभव आणि त्याच्या कामगिरीनं टीममधील इतर बॉलर्सनाही हुरूप चढेल... आणि टेस्ट सीरिजमध्ये तेही अचूक लाईन लेंग्थवर बॉलिंग करून प्रतिस्पर्ध्यांनी नामोहरम करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही...




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 17:52


comments powered by Disqus