Last Updated: Sunday, March 16, 2014, 09:23
www.24taas.com, झी मीडिया, ढाका२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.
मुख्य स्पर्धेला २१ मार्चपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीनं होणार आहे. गेल्या चार टी-२० वर्ल्ड कपमध्ये चार नवे चॅम्पियन क्रिकेटविश्वाला मिळाले आहेत. त्यामुळे नेमकी कुठली टीम सरस ठरणार हे सांगणं कठीण आहे.
त्यामुळे या टी- २०महासंग्रामात क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळतो की, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी कोणती टीम बाजी मारते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 09:23