युवीचे कमबॅक, टी-२० संघ जाहीर

टी-२० संघ जाहीर, युवीचे कमबॅक

टी-२० संघ जाहीर, युवीचे कमबॅक
www.24taas.com, चेन्नई

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत होणा-या टी-२०विश्वआचषक स्प र्धेसाठी युवराज सिंगला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे युवीचे आजारानंतर कमबॅक झाले आहे.

कर्करोगाशी सामना करून युवराज पुन्हा मैदानात उतरला. आता तो विश्‍वचषक स्‍पर्धेत पुनरागमन करणार आहे. युवराज सिंग फिट असल्‍याचे प्रमाणपत्र फिजिओने दिले. युवराजसोबतच हरभजन सिंग यालाही संधी देण्‍यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज लक्ष्‍मीपती बालाजी याचाही समावेश करण्‍यात आला आहे.

टी-२० संघ

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, सुरेश रैना, प्रग्ज्ञान ओझा, विराट कोहली, गौतम गंभीर, झहीर खान, रोहित शर्मा, पियुष चावला, आर. अश्विन, हरभजन सिंग, लक्ष्मीोपती बालाजी, सुरेश रैना, इरफान पठाण, मनोज तिवारी, अशोक डिंडा

तर न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारतीय संघ पाच वनडेबरोबर दोन टी-२० तर तीन कसोटी सामने खेळणार आहे. तेज गोलंदाजांमध्ये झहीर खान, इशांत शर्मा, मुनाफ पटेल, लक्ष्मीपती बालाजी यांचा समावेश आहे.

कसोटी संघ

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्मा, व्हि. व्हि. एस. लक्ष्मण, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, जहीर खान, उमेश यादव, प्रग्ज्ञान ओझा, पीयूष चावला, इशांत शर्मा

First Published: Friday, August 10, 2012, 16:05


comments powered by Disqus