युवीची डबल सेंच्युरी... धावांचा पाडला पाऊस, yuvraj singh double century in dulip trophy

युवीची डबल सेंच्युरी... धावांचा पाडला पाऊस

युवीची डबल सेंच्युरी... धावांचा पाडला पाऊस
www.24taas.com, हैदराबाद

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर युवराजचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने दिमाखात पुनरागमन केले आहे. दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर विभागाकडून खेळताना युवराजने द्विशतक झळकावले आहे. युवीने २४१ चेंडूंत शानदार २०८ धावा ठोकल्या. युवीच्या या खेळीत ३३ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या उत्तर विभागविरुद्ध मध्य विभाग क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी युवीने १३३ धावांवर नाबाद राहिला होता. अखेर दुसर्‍या दिवशी मुरली कार्तिकने त्याला २०८ धावांवर बाद करण्यात यश मिळवले.

कॅन्सर आजारातून बाहेर पडल्यानंतर युवी कदाचित कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट खेळू शकणार नाही, असे अंदाज बांधले जात होते. पण युवराजच्या द्विशतकी खेळीनंतर त्याने सर्व अंदाजांना खोटे ठरविले आहेत.

First Published: Monday, October 15, 2012, 15:42


comments powered by Disqus