मीडियामधील काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया, black day for media

मीडियासाठी काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया

मीडियासाठी काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया
www.24taas.com, मुंबई

मीडियाची राजकीय नेत्यांकडून होणारी मुस्कटदाबी याचा निषेध म्हणून आज `काळा दिवस` पाळण्यात येतो आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियावर येणारी बंधने यांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.

गेल्या ६५ वर्षांत दुसऱ्यांदा मीडियावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न झालाय. माध्यमांचा आवाज दाबण्याचा केला गेलेला हा दिवस मीडियासाठी काळा दिवस ठरलाय. संपादकांना झालेल्या या बेकायदेशीर अटकेचा झी न्यूजनं जोरदार निषेध केलाय.

आपणही आपल्या भावना व्यक्त करा. आपल्या प्रतिक्रिया आमच्या विशेष कार्यक्रमात दाखविण्यात येतील.`झी २४ तास` या घटेनाचा जाहीर निषेध करीत आहे. आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या रोखठोक प्रतिक्रिया.

First Published: Wednesday, November 28, 2012, 13:26


comments powered by Disqus