Last Updated: Wednesday, July 31, 2013, 16:38
www.24taas.com, झी मीडिया, शहापूर पत्नीकडून हुंडा मिळाला नाही म्हणून पतीनं तिला आपल्या तीन मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावात घडलीय.
उपेंद्र पवार असं या नराधम पतीचं नाव आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरत मधल्या एका महिलेशी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात उपेंद्रनं तिसरं लग्न केलं. त्यानंतर उपेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेकडे तीन लाख हुंडा आणण्याची मागणी केली. मात्र, तीनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. यासंदर्भात तीनं माहेरच्यांकडे कुठलीही मागणी केली नाही. याचा राग येऊन नराधम पतीनं आपल्या पत्नीला शरीर संबंधांसाठी आपल्याच तीन मित्राच्या स्वाधीन केलं. या तीन मित्रांनी या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेनं घरातून वेळीच पळ काढला आणि आपली अब्रू वाचवली.
हा प्रकार या महिलेनं आपल्या माहेरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 16:38