शाहरुखला ‘वानखेडे’वर प्रवेश मिळणार?, sharukh will get entry on wankhede?

शाहरुखला ‘वानखेडे’वर प्रवेश मिळणार?

शाहरुखला ‘वानखेडे’वर प्रवेश मिळणार?
www.24taas.com, मुंबई

गेल्या वर्षीची ‘आयपीएल-५’ गाजली ती शाहरुखच्या वानखेडे स्टेडियमवरील धांगडधिंग्यामुळे आणि त्याच्यावर स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी घातल्या गेलेल्या बंदीमुळे... आज लवकरच सुरू होणाऱ्या ‘आयपीएल-६’च्या पार्श्वभूमीवर या बंदीबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यानंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. शाहरुख खानवरील बंदीची ती शिक्षा रद्द व्हावी यासाठी त्या क्षणापासून अनेक जण प्रयत्न करत होते. शाहरुखच्या बंदीच्या निर्णयावर फेरविचार करण्याबाबत ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ला विनंती करण्यासाठी बीसीसीआयने शनिवारी दुपारी ४ वाजता वानखेडे स्टेडियमवर बैठक आयोजित केली आहे. बीसीसीआयच्या वतीनं या बैठकीसाठी कोण उपस्थित राहणार, हे अजून निश्चित नाही. शाहरुख खानवरील बंदी उठवण्यासाठी बीसीसीआयचे उपाध्यक्ष व आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला प्रयत्नशील आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मासिक बैठक येत्या १ एप्रिल रोजी असल्याचे कळते.

गेल्या आयपीएलच्या सत्रात ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्याम ‘मुंबई इंडियन्सक’वरील विजयानंतर शाहरूखनं वानखेडे स्टेयडियमवर धिंगाणा घातला होता. सुरक्षा रक्षाकाला मारहाण करणाऱ्या शाहरुखविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

First Published: Saturday, March 30, 2013, 08:54


comments powered by Disqus