Last Updated: Sunday, November 18, 2012, 00:43
www.24taas.com, लंडनमहाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
बाळ ठाकरे यांचा प्रवास हा कार्टुनिस्टपासून झाला. त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तरी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही तसेच कोणतेही पद स्वीकारले नाही. तरीही त्यांचा राजकारणावर प्रभाव होता. खासकरून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने म्हटले आहे.
बाळ ठाकरे हे एक चांगले वक्ते होते. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे ते लोकप्रिय होते. त्यांची भाषणे युवकांवर मोहीनी घालीत होती. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे मुंबईत निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मध्येच त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त आले होते मात्र, शनिवारी ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून त्यांचा दबदबा राहिला होता. त्यांच्या निधनानंतर मुंबई कडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रात्री भाजप नेत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. हा भोजनाचा बेत रद्द करण्यात आल्याची माहिती बीबीसीने आपल्या वृत्तात दिली आहे.
First Published: Sunday, November 18, 2012, 00:40