Last Updated: Wednesday, November 14, 2012, 08:52
www.24taas.com,न्यूयॉर्क अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.
२००६मध्येही सुनीता विल्यम्स सहा महिने राहिले अवकाशात राहीली होती. तिची दुसऱ्यांदा अंतराळ मोहीम आहे. सुनीता ही सध्या अमेरिकी नागरिक आहे. सुनीताने अवकाश स्थानकातून अमेरिका अध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान केले होते. अंतराळातून मतदान करणारी सुनीता ही पहिली महिला ठरली आहे.
अवकाश स्थानकात अधांतरी तरंगत भारतीय तिरंग्याच्या पार्श्वूभूमीवर कॅमेऱ्यासमोर येत सुनीताने दिलेल्या दिवाळी शुभेच्छांची चित्रफीत येथील स्थानिक टीव्ही कार्यक्रमात दाखविण्यात आली. मला प्रत्येक भारतीय आणि जगातील भारतीय वंशाच्या प्रत्येकाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, असे सुनीता म्हणाली. दिवाळी हा प्रकाशाचा अनोखा सण आहे. आंतरराष्ट्रीय स्थानकात अनोखी असणारी दिवाळी साजरी करताना मला खूप आनंद होत आहे.
First Published: Wednesday, November 14, 2012, 08:36