23 महाविद्यालयांची मान्यता रद्द 23 colleges recognized

23 महाविद्यालयांची मान्यता रद्द

23 महाविद्यालयांची मान्यता रद्द
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

23 बीएएमएस महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत हलवण्यात आलेलं नाही. याचविरोधात गेल्या २४ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्यातल्या 5 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. मात्र सरकार अजूनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ही व्यथा या एकाच पालकाची नाही तर इथे बसलेल्या या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांची आहे. बीएएमएस या आयुर्वेदिक पदवीसाठी 2011-2012 साली प्रवेश घेतलेल्या 21 आयुर्वेद महाविद्यालयांची मान्यता आयुष विद्यापीठानं रद्द केली होती. यामध्ये सरकारचं अनुदान असलेली 4 महाविद्यालयं आहेत. मात्र, या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या तब्बल 1019 विद्यार्थ्यांचं वर्ष आणि लाखो रुपयांची फी अक्षरश: वाया गेलीय..याविरोधात गेल्या 24 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे. तर गेल्या 9 दिवसांपासून विद्यार्थी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यातल्या पाच विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी जीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यातल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे आता तरी सरकारनं लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

2012 साली कोर्टानेच काही अटींवर या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन दिलं गेलं नसल्याचा आरोप होतोय. मात्र, वेळीच राज्य सरकारनं लक्ष देऊन या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला असता तर ही वेळ आली नसती असं शिक्षण तज्ञांचं म्हणणं आहे.


गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणा-या या विद्यार्थ्यांचा प्रश्न अजून अधांतरीच आहे. ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्यांना मोठं करण्यासाठी त्यांच्या पालकांनी मोठी किंमत मोजली. सरकारनं आता याकडे गांभीर्यानं आणि तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 3, 2013, 13:40


comments powered by Disqus