कॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, राज्य सरकारचा आदेश, Day party : State Goverment Notice To All Collage

कॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश

कॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई

सध्या तरुणांमध्ये फ्रेंडशिप डेचा उत्साह आहे. पण हा अतिउत्साह ठरु नये, यासाठी सरकारनं कंबर कसलीय. फ्रेंडशिप डे असो किंवा व्हॅलंटाईन डे, या निमित्तानं होणा-या दारु पार्ट्या रोखा, असे आदेशच विद्यापीठांना देण्यात आलेत.

कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या एकच चर्चा रंगतेय..दररोज कट्यावर बसून `दुनीयादारी` करणा-या या तरुण-तरुणींमध्ये उत्साह आहे तो रविवारी येणा-या फ्रेंडिशप डे चा...सेलिब्रेशन म्हणजे पार्टी आणि धम्माल.. त्यातच मग यातल्या काही पार्ट्यांत दारु आणि अंमली पदार्थांसारखे चुकीचे ट्रेंड आलेच.

सेलिब्रेशनच्या नावाखाली अशी चूक करणा-या या तरुणाईला यापासून रोखायला हवं. यासाठीच पुढाकार घेतलाय, तो राज्य सरकारनं.. तरुण-तरुणी सर्वाधिक वेळ घालवतात तो कॉलेज कॅम्पसमध्ये, आणि म्हणूनच राज्यातल्या सर्व विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आलय.
फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर होणा-या पार्ट्या रोखा, तरुण-तरुणींना पार्ट्यांचं आयोजन करण्यापासून प्रतिबंध करा , पार्ट्यांचं आयोजन रोखण्यासाठी महाविद्यालयांना निर्देश द्या, विद्यापीठ याबाबत काय करणार उपाययोजना, असं या पत्रात नमुद करण्यात आलंय.

तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी ही सध्या मोठीसमस्या आहे. यामुळेच तरुणांमध्ये कायदेशीर कारवाईच्या धाकासोबतच याबाबत जनजागृती करणंही तितकच महत्वाचं आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण शिक्षण विभागाकडून याची दखल घेण्यात आलीय. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील या मोहिमेतून तरुणांना नवी दिशा मिळावी हीच अपेक्षा, आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 3, 2013, 14:50


comments powered by Disqus