राज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार, Ajit Pawar's reluctance about no exams.upto 8th Std.

राज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार

राज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार
www.24Taas. झी मीडिया,पुणे

राज्यात आठवी पर्यंतच्या परीक्षा पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार पुढील अधिवेशनात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासंदर्भात प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून पुढे केंद्राकडे पाठवण्यात येणारेय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.

परीक्षाच न घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण न पटणारे आहे. आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे, हेच लक्षात येत नाही. त्यामुळे परीक्षा सुरू करण्याचा विचार आहे. त्याबाबत ठराव करून तो आम्ही केंद्राकडे पाठविणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

शिक्षणहक्क कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला काहीही हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून परीक्षा घेण्याबाबतचा ठराव करण्यात येणार आहे. नंतरतो केंद्राकडे पाठविल्यानंतर राज्य सरकारच्या अधिकारातील विषय या नात्याने परीक्षा पुन्हा सुरू करता येऊ शकतील. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा ठराव होईल, असे पवार यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 11:29


comments powered by Disqus