बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी, HSC result declared, state result 79.95 %

बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ७९.९५ टक्के इतका लागला आहे. तर राज्यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८५.८८ टक्के इतका लागला आहे.

बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यात ८४.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ७६.६२ मुलं बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.


पहा विभागानुसार काय आहे निकाल

मुंबई - ७३.१० %

पुणे - ८१.९१ %

नाशिक - ७९.०१ %

कोल्हापूर - ८४.१४ %

कोकण - ८५.८८ %

नागपूर - ७३.१० %

लातूर - ८३.५४ %



मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सकाळी ११ वाजता निकाल उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

या संकेतस्थळावर निकाल १२ वीचा निकाल पाहता येईल.

www.msbshsc.ac.in

mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 10:57


comments powered by Disqus