पी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला , IIT JEE (Advanced) Results 2013 declared

पी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला

पी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला
www. 24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली

आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.

तर ए रवी चंद्रा हा या परीक्षेत दुसरा आला आहे. पी. साई संदीप हा सरकारी शाळेतल्या शिक्षकाच्या मुलगा आहे. यासाठी घेण्यात येणा-या जेईई परीक्षेत त्यानं ३६० पैकी ३३२ गुणांची कमाई केलीय. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे संदीपचे आदर्श असून आता तो मुंबई - IIT मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेणार आहे.

मुंबई विभागात मोहित शहानं अव्वल क्रमांक पटकावलाय. मोहितनं मोहितने ३६० पैकी २८७ गुणांची कमाई केलीय. प्रत्यक्षात एक लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी जेईई-अडव्हान्स ही परिक्षा दिली. त्यापैकी अवघे १५,९४७ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 18:56


comments powered by Disqus