Last Updated: Wednesday, June 18, 2014, 09:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली. आपणच गुणवंत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलेय. आता निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलेय. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येतील.
पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून ठेवला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा दुसरा भाग भरायचा असून, विद्यार्थ्यांना १८ ते २५पर्यंत अर्ज सादर करता येईल.
अर्जात काही त्रुटी असल्यास त्या २६ जूनपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्त करता येणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर १८ ते २७ जूनपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
या कोट्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तसेच २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त आणि इनहाउस कोट्यातील शिल्लक जागा महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाइन सादर करावा लागणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 09:03