Last Updated: Wednesday, June 13, 2012, 17:07
www.24taas.com, मुंबई 
दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते. या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातफेर् शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (आय.टी.आय) अनेक कोसेर्स राबवले जातात. आठवी पास असलेल्या विद्यार्थ्यांपासून ते बारावी पास विद्यार्थ्यांपर्यंत खूप विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
नाममात्र शुल्कआयटीआय शिक्षणासाठी शुल्कही अत्यंत नाममात्र असतं. आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षर्णथ्याकडून दरमहा १५ रुपये शुल्क आकारलं जातं. तर वसतिगृह शुल्कही दरमहा अवघं २० रुपये असतं. प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के प्रशिक्षणाथीर्ंना दरमहा ४० रुपये विद्यावेतन देऊ केलं जातं. डिपॉझिट म्हणून प्रशिक्षणार्थ्याकडून एकूण ७५ रुपये घेतले जातात.
आय.टी.आयमधल्या उपलब्ध जागाराज्यभरात एकूण ७५० औद्योगिक प्रशिक्षण संस्था, केंदे असून त्यात एकूण १ लाख ३० हजार ८०८ जागा उपलब्ध आहेत.
आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कोसेर्सअभियांत्रिकीसॅनिटरी हार्डवेअर फिटर(६ महिने)
बिगरअभियांत्रिकीओल्ड एज केअर (६ महिने)
सुतारकाम (१ वर्ष)
ट्रॅक्टर मेकॅनिक (१ वर्ष)
नळ कारागिर (१ वर्ष)
गवंडी (१ वर्ष)
पत्रे कारागिर (१ वर्ष)
फिटर कम मेकॅनिक (१ वर्ष)
कॅबिनेट फनिर्चर मेकर (१ वर्ष)
कटिंग अॅण्ड स्युईंग (१ वर्ष)
चामड्याची पादत्राणं बनवणे(१ वर्ष)
एम्ब्रॉयडरी अॅण्ड नीडल वर्क
क्राफ्ट्समन केन अॅण्ड बांबू वर्क
२ वर्षांच्या मुदतीचे काही अभियांत्रिकी कोसेर्सही आयटीआयकडून राबवले जातात. त्यासाठी पात्रता आठवी उत्तीर्ण अशीच आहे.
तारतंत्री द्य यांत्रिक कृषी यंत्रसामग्री रंगारी
दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना तर आयटीआयमध्ये अनेक कोसेर्स करण्याची संधी मिळू शकते. अगदी ड्रायव्हिंग, हाऊसकिपिंगपासून ते डेटा एण्ट्री ऑपरेटरपर्यंत अनेक प्रकारची कौशल्यं आत्मसात करता येतात.
दहावी पास विद्यार्थ्यांना करता येण्यासारखे ६ महिने कालावधीचे अभ्यासक्रमड्रायव्हर कम मेकॅनिक
बिल्डींग मेंटेनन्स
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅलिकल रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ टू व्हिलर
वर्ष कालावधीचे कोर्सस
डेटा एण्ट्री ऑपरेटर
इन्स्टिट्यूशनल हाऊसकिपिंग
प्रि-प्रिपरेटरी स्कूल मॅनेजमेंट
डोमेस्टीक हाऊसकिपिंग
फ्रंट ऑफिस असिस्टंट
इव्हेंट मॅनेजमेंट असिस्टंट
प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर
डिझेल मेकॅनिक
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
इंटिरिअर डेकोरेशन अॅण्ड डिझायनिंग
मेकॅ. रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेइकल/ लाइट मोटर व्हेइकल
बेकरी अॅण्ड कन्फेशनर
ड्रेस मेकिंग
स्टिवर्ड
अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, मुंबई-१ या पत्त्यावर संपर्क साधावा.
एकूण जागासर्वसाधारण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - ३०६७१३१६
आदिवासी उपयोजनेअंतर्गत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - ६०१२११६
आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था - २८१८२४
मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था - १५३२५२
विशेष घटक योजनेअंतर्गत संस्था - ४००
एकूण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - ४११८८९०८
अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद - ३३९४१९००
एकूण औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि केंद - ७५०१३०८०८
First Published: Wednesday, June 13, 2012, 17:07