सुमारे दीडशे शाळांचा निकाल शून्य% - Marathi News 24taas.com

सुमारे दीडशे शाळांचा निकाल शून्य%

www.24taas.com, मुंबई 
 
यावर्षी राज्यातील सुमारे दीडशे शाळांचे निकाल ०% लागलाय. दहावी आणि बारावीच्या शाळांचा यात समावेश आहे. अशा शून्य टक्के निकालांच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
 
यंदा दहावीच्या निकालात राज्यातल्या तब्बल १४४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागलाय. यावर्षी दहावीच्या ९७ तर बारावीच्या ४७ शाळांचे निकाल शून्य टक्के लागले आहेत. या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नीट शिकवलं जात नाही असा अर्थ काढत शिक्षण विभागानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरला आहे. या सगळ्या शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
 
पुण्यामध्ये दहावीच्या १० शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. औरंगाबादमध्ये २३, मुंबईत २३, नाशिकमध्ये ५, अमरावतीत १२, लातूरमध्ये १८, कोल्हापूरमध्ये ३ आणि नागपूरमध्ये ३ अशा ९७ शाळांनी निकालाचा भोपळा फोडलेला नाही. तर बारावीच्या ४७ शाळांचा निकाल शून्य टक्के लागलाय.

First Published: Monday, June 18, 2012, 20:57


comments powered by Disqus