विद्यापीठ का खेळतेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी?? - Marathi News 24taas.com

विद्यापीठ का खेळतेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी??

www.24taas.com, कोल्हापूर
 
शिवाजी विद्यापीठात पुरवठा होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमधून याबाबत नाराजी व्यक्त होते आहे.
 
कोल्हापुरातलं शिवाजी विद्यापीठ अनेक कारणांनी सतत चर्चेत असतं. सध्या इथल्या पाण्याच्या टाक्यांमधून अशुद्ध पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तसंच परिक्षांच्या दिवसातच असा प्रश्न उद्भवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रशासनाबद्दल नाराजी दिसून येते आहे.
 
त्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्युरिफायर बसवण्याची मागणी होते आहे. विद्यापीठातला पाणी प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेनं दिला आहे. दुषित पाण्याचा प्रश्न प्रशासनानं लवकर सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
 
 
 

First Published: Sunday, March 25, 2012, 09:37


comments powered by Disqus